
थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी
थंडीच्या दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे दह्याची आंबटगोड कढी. कढीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून कढी बनवली जाते. टोमॅटोची कढी, आंबट कोकम कढी इत्यादी कढीचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. जेवणाच्या ताटात कायमच भातासोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी डाळ किंवा भाजी बनवली जाते. पण सतत तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. दह्याच्या कढीचे सेवन केल्यामुळे तोंडाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया गरमागरम दह्याची कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार
जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी