(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय भोजनातील नान ही एक अशी डिश आहे जी पाहताक्षणीच हॉटेलची आठवण करून देते. गरमागरम पनीर, दाल मखनी किंवा कोणत्याही ग्रेव्हीबरोबर नान मिळालं की जेवणाचा आनंद दुप्पट होतो. बहुतेकांना वाटतं की नान फक्त तंदूरमध्येच छान बनतं, पण घरच्या तव्यातही अगदी मऊ, फुललेलं आणि बटरचा सुवास दरवळणारं नान अप्रतिम तयार करता येतं. घरच्या घरी नान बनवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात आपण घटक ताजे ठेवू शकतो, आवडीनुसार बटर, साजूक तूप किंवा कोथिंबीर वापरू शकतो आणि हॉटेलपेक्षा अधिक ताजेपणा मिळवू शकतो.
तव्यात नान बनवताना एक खास मजा असते,तंदूरसारखी उष्णता नसली तरी योग्य पद्धतीने शिजवलं तर नान अगदी मऊ आणि हलकं होतं. पीठात दही घालण्यामुळे त्याला छान आंबटपणा येतो आणि नान छान फुलून येतो. अनेकदा घरात अचानक पाहुणे आले किंवा काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी झटपट उपयोगी पडते. शिवाय, ज्यांच्याकडे ओव्हन किंवा तंदूर नाही त्यांच्यासाठी ही पद्धत म्हणजे एकदम परफेक्ट पर्याय.
साहित्य :
कृती :






