
रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
Curry Leaves Chutney: भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्त्याच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो. भाज्यांची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता जेवणात घातला जातो. कढीपत्त्याचा सुगंध आणि चव पदार्थांची रंगत वाढवतो. त्यामुळे जेवण बनवता कढीपत्त्याचा पानांचा वापर करावा. लहान मुलांसह मोठेसुद्धा जेवणात टाकलेला कढीपत्ता बाजूला काढून टाकतात. पण असे न करता कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. रिकाम्या पोटी ताजी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता गुणकारी मानला जातो. कढीपत्ता खाल्ल्यामुळे केस मजबूत होतात, केस गळणे थांबते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. त्यामुळे कच्चा कढीपत्ता खाण्याऐवजी या पद्धतीने बनवलेली कढीपत्त्याच्या पानांची चटणी खावी. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी साहित्यात कढीपत्त्याच्या पानांची चटणी तयार होते.(फोटो सौजन्य – istock)