
डब्यासाठी नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग राजस्थानी पद्धतीमध्ये झटपट बनवा 'दही मिरची'
रोजच्या जेवणात नेहमीच काय भाजी बनवावी बऱ्याचदा सुचत नाही. कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही राजस्थानी पद्धतीमध्ये झणझणीत दही मिरची बनवू शकता. हा पदार्थ तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. राजस्थानी पदार्थांची चव अतिशय सुंदर लागते. कमीत कमी साहित्यात बनवले जाणारे चमचमीत पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी दही मिरची हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. राजस्थानी पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. घाईच्या वेळी जेवणाच्या डब्यात भाजी काय बनवावी सुचत नसेल तर तुम्ही दही मिरची बनवू शकता. राजस्थानी स्टाईल पारंपरिक चवीचा अनुभव देणारे पदार्थ सहज घरी बनवता येतात. चला तर जाणून घेऊया राजस्थानी स्टाईल दही मिरची बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)