
व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात करा प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले शेवगा-दुधीचं गरमागरम सूप
Food Recipe: वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट, सप्लिमेंट, तासंतास उपाशी राहणे, गोळ्यांचे सेवन, वजन कमी करण्याची इनजेक्शन सुद्धा घेतले जातात. पण चुकीच्या पद्धतीने वजन कमी केल्यास शरीरावर त्याची वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम करणे पुरेसे नसून आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. वजन कमी करताना विविध प्रकारच्या सूपचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला तेलाचा अजिबात वापर न करता शेवगा-दुधीचे गरमागरम सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यात फायबरयुक्त भाज्यांचे सेवन करावे. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होते. दुधीभोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. तर शेवग्याच्या शेंगाचा आहारात नियमित समावेश केल्यास वजन कमी होण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक सुद्धा मिळतील. शेवगा-दुधीचे सूप बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही सूप बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपाी.(फोटो सौजन्य – pinterest)