
थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण
Amla Ladoo Recipe: राज्यभरात सगळीकडे थंड वारे वाहू लागले आहेत. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीरसोबतच त्वचा आणि केसांच्या सुद्धा समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. हाडांमध्ये वेदना, सांधे दुखी, कंबर दुखी तर काहीवेळा वाताच्या त्रासामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी शरीराला पोषण आहाराची आवश्यकता असते. शरीरातील पोषण कमी झाल्यामुळे आणि लोहाची कमतरता निर्माण झाल्यामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते आणि दैनंदिन जीवनातील कामे करताना अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात विटामिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक असतात. त्यामुळे आहारात नियमित आवळ्याचे आवश्यक सेवन करावे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केस मजबूत होतात, त्वचेचा रंग उजळदार होण्यासोबतच हाडांना सुद्धा पोषण मिळते. पण नेहमीच कच्चा आवळा खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये आवळ्याचे लाडू बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Ans: आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. आवळ्याचा लाडू खाल्ल्याने शरीराला पोषण मिळण्यास आणि रोगप्रतिकारशक्तीच्या सामान्य कार्याला मदत होऊ शकते.
Ans: होय. हिवाळ्यात आवळ्याचा लाडू आहारात समाविष्ट करता येतो. यामुळे शरीराला व्हिटॅमिन C आणि इतर पोषक घटक मिळतात.
Ans: आवळ्यातील व्हिटॅमिन C कोलेजन निर्मितीस मदत करते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य आणि नैसर्गिक लवचिकता टिकवण्यासाठी आवळा उपयुक्त ठरू शकतो.