Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात… दुधीभोपळ्यापासून घरी बनवा ‘कलाकंद’

Dudhi Kalakand Recipe : लहान मुले दुधीची भाजी पाहून तोंड फिरवतात? मग भाजी सोडा यावेळी दुधीपासून घरी तयार करा गोड, चवदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा कलाकंद. याची चव घरातील सर्वांना खुश करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 09:35 AM
Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात... दुधीभोपळ्यापासून घरी बनवा 'कलाकंद'

Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात... दुधीभोपळ्यापासून घरी बनवा 'कलाकंद'

Follow Us
Follow Us:
  • दुधी आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरतो.
  • पण अनेकांना याची भाजी खायला आवडत नाही.
  • अशात दुधीभोपळ्यापासून तुम्ही चवदार मिठाई तयार करु शकता.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, हलके आणि पौष्टिक पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा वेळी दुधी भोपळ्यापासून बनवलेला कलाकंद हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दुधी भोपळा म्हटले की अनेकांना फक्त भाजी आठवते, पण याच दुधीपासून तयार होणारा कलाकंद चवीला अप्रतिम लागतो. दूध, मावा आणि दुधी यांचे सुंदर मिश्रण असलेली ही मिठाई घरच्या घरी सहज बनवता येते.

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश

दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. तसेच फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि अनेक आवश्यक पोषक घटक त्यात आढळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास, शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि उष्णतेपासून संरक्षण मिळवून देण्यास मदत होते. पारंपरिक मिठाईंपेक्षा दुधीचा कलाकंद तुलनेने हलका आणि पौष्टिक असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. चला स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 2 कप किसलेला दुधी भोपळा
  • 1 कप मावा (खवा)
  • ½ कप साखर (चवीनुसार)
  • 2 टेबलस्पून तूप
  • ½ टीस्पून वेलची पूड
  • 8-10 बदाम आणि पिस्ते (बारीक कापलेले)
  • 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस (ऑप्शनल)
Recipe: मैद्याऐवजी गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत समोसे; नोट करा सोपी रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्यातील बिया काढून तो बारीक किसून घ्या.
  • जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यामध्ये किसलेला दुधी घाला आणि मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे परता.
  • दुधी मऊ झाल्यावर त्यात साखर घाला. साखर वितळल्यानंतर सुटलेले पाणी पूर्णपणे आटेपर्यंत शिजवा.
  • आता त्यात मावा घालून मिश्रण सतत हलवत एकजीव करा.
  • मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर वेलची पूड आणि इच्छेनुसार खोबऱ्याचा किस घालून चांगले मिसळा.
  • मिश्रण कढईच्या कडा सोडू लागल्यावर गॅस बंद करा आणि तयार मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये समान पसरवा.
  • वरून बदाम आणि पिस्त्याचे काप भुरभुरवा. पूर्ण थंड झाल्यावर आवडीच्या आकारात तुकडे कापून सर्व्ह करा.
  • अधिक रिच चव हवी असल्यास माव्याचे प्रमाण थोडे वाढवू शकता.
  • साखरेऐवजी गूळ वापरल्यास वेगळी आणि नैसर्गिक गोडी मिळते.
  • कलाकंद अधिक मऊ हवा असल्यास थोडे कंडेन्स्ड मिल्क घालू शकता.
  • हा स्वादिष्ट आणि पौष्टिक दुधीचा कलाकंद उन्हाळ्यातील खास गोड पदार्थ म्हणून नक्की करून पाहा.
 

Web Title: How to make dudhi kalakand at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.