
Coconut Chutney: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
Coconut Chutney Recipe: ओल्या खोबऱ्याचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. ओल्या खोबऱ्याची चटणी, डाळ किंवा इतर पदार्थांमध्ये ओल खोबर टाकले जाते. इडली, डोसा, आंबोळी किंवा गरमागरम बटाटे वडे बनवल्यानंतर त्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी अतिशय आवडीने खाल्ली जाते. ओल्या खोबऱ्याचा गोडवा, मिरचीचा तिखटपणा आणि झणझणीत फोडणी देऊन बनवलेली चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. ओल्या खोबऱ्याची चटणी २४ तासांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे आवश्यकतेनुसार चटणी बनवावी. बऱ्याचदा चटणी बनवताना ती खूप जास्त पातळ होऊन जाते, ज्यामुळे चटणीची चव चांगली लागत नाही. या पारंपरिक पद्धतीने चटणी बनवल्यास पदार्थाची चव उत्तम लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)