
लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
Pickle Recipe: बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे विकला आले आहेत. आवळे शरीरासाठी वरदान मानले जातात. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. याशिवाय अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. जेवणाच्या ताटात कायमच अनेकांना लोणचं लागत. लोणच्याशिवाय जेवणाची चव अजिबात लागत नाही. कैरीचे लोणचं, मिरचीचे लोणचं, गोड लोणचं इत्यादी लोणचं खाऊन कंटाळा आल्यास आंध्रा स्टाईलने तुम्ही आवळ्याचे आंबट तिखट लोणचं बनवू शकता. या पद्धतीने बनवलेले लोणचं एक वर्षापर्यंत व्यवस्थित टिकून राहते. कच्चा आवळा खायला अनेकांना आवडत नाही, अशावेळी आवळ्यापासून बनवलेले चटकदार लोणचं तुम्ही बनवून खाऊ शकता. आवळ्याचे लोणचं तुम्ही गरमागरम भात, तांदळाची भाकरी, चपाती इत्यादी पदार्थांसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे लोणचं बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)