
वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन
Weight Loss: वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण चुकीच्या पद्धतीने वजन कमी केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासोबतच शरीराला हायड्रेशनची सुद्धा तितकीच आवश्यकता असते. अशावेळी इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्याऐवजी दुधी भोपळ्याचा वापर करून बनवलेले सूप प्यावे. दुधी भोपळा शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतो. यामध्ये पोटॅशियम, व्हिटामिन सी आणि इतर सूक्ष्म पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. दैनंदिन आहारात नेहमीच वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करावे. भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होऊन पोट स्लिम दिसते. दुधी भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही दुधी भोपळ्याचे सूप बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)