
अजिबात कडवट होणार नाहीत मेथीचे लाडू! या सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हेल्दी चविष्ट लाडू
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. लाडू बनवताना वापरले जाणारे सर्व पदार्थ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. त्यामुळे हिवाळ्यात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. मेथीचे लाडू सगळ्यांचं खायला आवडतात. पण लहान मुलं कडू चवीमुळे मेथीचे लाडू खाण्यास नकार देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेथीच्या लाडूमधील कडवटपणा कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मेथीचे लाडू अजिबात कडवट होणार नाहीत. आरोग्यासाठी मेथी दाणे अतिशय प्रभावी ठरतात. मेथी दाण्यांमध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका टाळतो. मेथीचे लाडू शरीरासाठी धोकादायक ठरत नाही. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच मेथीचा पौष्टिक लाडू खाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये मेथीचे लाडू बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)