पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा पौष्टिक लाडू
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची जास्त आवश्यकता असते. कारण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीत कायमच उष्ण पदार्थांचे सेवन करावे. भारतीय आहारातील पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ शरीराला तात्काळ ऊर्जा देतात आणि पोषण देतात. चवदार पदार्थांसोबतच पौष्टिक पदार्थांचे सुद्धा सेवन करावे. थंडीला सुरुवात झाल्यानंतर लहान मोठ्या आजारांची लागण शरीराला होते. या आजारांची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासोबतच थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीत शरीराला उष्णता देण्यासाठी हिरव्या मुगाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिरवे मूग शरीरासाठी वरदान ठरतात. प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असलेले लाडू खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. थंडीत पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात नियमित एक मुगाचा लाडू खावा. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि शरीराला ऊर्जा मिळेल. जाणून घ्या हिरव्या मुगाचे लाडू बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






