महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी!
वयाच्या चाळीशीमध्ये महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. मासिक पाळीत उद्भवणाऱ्या समस्या, कामाचा वाढलेला तणाव, चेहऱ्यावर येणारे पिगमेंटेशन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाहीत. शरीरात सतत दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. महिलांच्या आरोग्यासाठी जवसाच्या बिया अतिशय प्रभावी ठरतात. या बियांचे सेवन केल्यामुळे हाडांमधील वाढलेल्या वेदना कमी होतात. याशिवाय शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये जवसाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जवसाची चटणी खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते, हाडांमधील वेदना कमी होतात, केस गळणे कमी होईल, याशिवाय त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसू लागते. चला तर जाणून घेऊया जवसाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट टोमॅटो चटणी! पराठा-चपातीसोबत लागेल सुंदर, नोट करा रेसिपी