ओव्हनचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा तवा पिझ्झा
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप आवडतो. पिझ्झाचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात वेगवेगळ्या ब्रेडचे पिझ्झा उपलब्ध आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाहेरून लगेच पिझ्झा मागवला जातो. पण नेहमी नेहमी बाहेर विकत मिळणारे पिझ्झा खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीच ओव्हनचा वापर न करता पिझ्झा बनवू शकता. प्रत्येक घरात ओव्हन उपलब्ध नसतो. अशावेळी पिझ्झा कशावर बनवायचा असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. त्यामुळे ओव्हनचा वापर न करता तुम्ही तव्यावर पिझ्झा बनवू शकता. हा पिझ्झा चवीला अतिशय सुंदर लागतो. तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या आणि भरपूर चीज घालून तुम्ही पिझ्झा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया तवा पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
कोणतेही केमिकल आणि प्रिझर्व्हेटीव्हचा वापर न करता अर्ध्या तासात झटपट बनवा आंबटगोड चवीचा टोमॅटो सॉस
चमचमीत खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा सर्वांच्या आवडीच्या Tandoori Momo चा बेत; नोट करा रेसिपी