
डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा
जेवणात कायमच डाळभात, भाजी चपाती खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. प्रत्येकालाच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खायला खूप आवडतात. झणझणीत आणि मसालेदार पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. डब्यासाठी कायमच भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर इत्यादी ठराविक भाज्या बनवल्या जातात. त्यातील अनेकांना न आवडणारी भाजी म्हणजे गवार. गवारचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये झणझणीत गवार ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गवार ठेचा भाकरी किंवा चपतीसोबत अतिशय सुंदर लागतो. ग्रामीण भागात भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर शेंगदाणे किंवा हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवून खाल्ला जातो. कमीत कमी साहित्यात तुम्ही झटपट गवार ठेचा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया गवार ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी