
थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पौष्टीक डिंकाचे लाडू
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडत आहे. वातावरणातील गारव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर शरीराला आजारांची लागण होण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार झाल्यानंतर शरीरात हळूहळू अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये कायमच शरीराला ऊब मिळेल अशा पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. आहारात काही प्रमाणात उष्ण पदार्थ खावेत. यामुळे पोटात निर्माण झालेली थंडी कमी होऊन शरीराचे तापमान संतुलित राहील. थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त भूक लागते. कितीही पदार्थ खाल्ले तरीसुद्धा ते कमीच वाटतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक डिंकाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी आणि योग्य प्रमाण सांगणार आहोत. कारण कोणतेही लाडू बनवण्याआधी योग्य प्रमाणात साहित्य घेतल्यास लाडूची चव अतिशय सुंदर लागते. तसेच लाडू दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहतात.डिंकाचे लाडू चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक डिंकाचा लाडू खाल्ल्या पोट कायम भरलेले राहील आणि लवकर भूक लागले. डिंकाच्या लाडूचे सेवन केल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल. हे लाडू बनवताना साखरेचा वापर न करता गूळ किंवा डिंकाचा वापर करावा.(फोटो सौजन्य – pinterest)
रसाळ, नरम अन् तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला पण साखरेचा नाही तर गुळाचा… नोट करा रेसिपी