लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नाचणी शेवग्याचं सूप
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. कारण मुलांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत असते. त्यांना कोणत्याही गंभीर आजाराची सहज लागण होते. त्यामुळे १ ते १० वर्षांखालील मुलांना कायमच घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावेत. विकतचे पदार्थ बनवताना एकाच तेलाचा अनेकदा वापर केला जातो. तसेच तिखट आणि अतितेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे लहान मुलं वारंवार आजारी पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणी शेवग्याचं सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप पौष्टिक आहेत. नियमित शेवग्याच्या शेंगा खाल्यास हाडे मजबूत राहण्यासोबतच शरीरात ताकद कायम टिकून राहील. शेगव्याच्या शेंगांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व ए, सी, आणि के, तसेच लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. तर नाचणीचे सेवन केल्यास लोहाची निर्मिती होऊन शरीरात रक्ताची कमतरता जाणवत नाही. चला तर जाणून घेऊया नाचणी शेवग्याचं सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी






