Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा ‘हिरव्या मूगडाळीचे अप्पे’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Green Moong Dal Appe Recipe : हे हिरव्या मुगडाळीचे अप्पे चविष्ट, हलके आणि आरोग्यदायी असल्यामुळे एकदा बनवले की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 09:30 AM
सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा 'हिरव्या मूगडाळीचे अप्पे', एकदा खाल तर पुन्हा बनवाल

सकाळचा नाश्ता फक्त टेस्टीच नाही तर पौष्टिकही करा, घरी बनवा 'हिरव्या मूगडाळीचे अप्पे', एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Follow Us
Follow Us:
  • हिरव्या मूगडाळीचे सेवन आरोग्याला अनेक फायदे मिळवून देते.
  • सकाळचा नाश्ता जर हेल्दी करायचा असेल तर हिरव्या मूगडाळीचे अप्पे उत्तम पर्याय ठरेल.
  • हा हलका, पाैष्टिक आणि चवीला रुचकर लागणारा नाश्ता आहे.
हिरव्या मुगडाळीचे अप्पे हे पारंपरिक चवीला आधुनिक हेल्दी ट्विस्ट देणारे उत्तम नाश्त्याचे पदार्थ आहेत. दक्षिण भारतीय पद्धतीतील अप्यांमध्ये हे अप्पे बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊसर लागतात. हिरवी मुगडाळ ही प्रथिनांनी, फायबरने आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असल्यामुळे हे अप्पे पोटभरीचे आणि आरोग्याला पौष्टिक ठरतात.

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

सकाळच्या न्याहारीसाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कमी तेलात तयार होणारे हे अप्पे पचायला हलके असून आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त आहेत. योग्य प्रमाणात मसाले आणि भाज्या घातल्यास चव आणखी खुलते. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • एक कप हिरवी मुगडाळ
  • अर्धा कप तांदूळ
  • एक छोटा कांदा बारीक चिरलेला
  • एक हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • एक लहान तुकडा आले
  • चिमूटभर हळद
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा चमचा जिरे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • आवश्यकतेनुसार तेल
जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम हिरवी मुगडाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन किमान चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवा.
    भिजलेली डाळ आणि तांदूळ पाणी काढून मिक्सरमध्ये घ्या. त्यात आले घालून थोडेसे पाणी टाकत जाडसर पीठ तयार करा. पीठ खूप पातळ नसावे.
  • हे पीठ एका भांड्यात काढून त्यात मीठ, हळद, जिरे, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा.
  • इच्छित असल्यास थोडेसे किसलेले गाजर किंवा शिमला मिरचीही घालू शकता.
  • अप्पे पात्र गरम करून प्रत्येक कपात थोडेसे तेल घाला.
  • प्रत्येक कपात तयार पीठ ओता. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या.
  • खालचा भाग सोनेरी झाला की अप्पे उलटवा आणि दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घ्या.
  • दोन्ही बाजूंनी छान भाजलेले अप्पे गरमागरम बाहेर काढा.
  • तयार अप्पे नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

Web Title: How to make green moong dal appe at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.