Ragi Pizza Recipe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत पिझ्झा सर्वांनाच खायला फार आवडतो पण याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. अशात आपल्या क्रेव्हिंग्सना पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरीच नाचणीच्या पिठाचा टेस्टी पिझ्झा तयार करु
(फोटो सौजन्य: Youtube)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
पिझ्झा कुणाला खायला आवडत नाही.
पण यात वापरला जाणारा मैदा आरोग्याच्या समस्या वाढवत असतो.
अशात मैद्याच्या जागी नाचणीचे पीठ वापरुन आपण तितकाच टेस्टी असा रागी पिझ्झा तयार करु शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत फास्ट फूडची क्रेझ वाढली असली तरी आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे, पण मैद्याच्या बेसमुळे तो अनेकदा अनारोग्यकारक ठरतो. अशा वेळी पौष्टिक पर्याय म्हणून रागी म्हणजेच नाचणीचा वापर करून बनवलेला पिझ्झा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हा पिझ्झा चविष्ट तर लागतोच, पण शरीरासाठीही फायदेशीर असतो. वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हेल्दी स्नॅकसाठी हा रागी पिझ्झा उत्तम आहे. घरच्या घरी साध्या साहित्यांत बनणारी ही रेसिपीनक्कीच सगळ्यांना आवडेल.
सर्वप्रथम एका भांड्यात नाचणी पीठ, गव्हाचे पीठ, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र मिसळून घ्या. त्यात दही आणि ऑलिव्ह ऑइल किंवा साध तेल घालून मऊसर पीठ मळून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी वापरा. हे पीठ झाकून काही वेळ बाजूला ठेवा.
त्यानंतर मळलेले पीठ घेऊन पिझ्झाच्या आकारात लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर हलके तेल लावा आणि हा बेस मंद आचेवर दोन्ही बाजूंनी थोडा शेकून घ्या.
बेस हलका शिजल्यावर त्यावर पिझ्झा सॉस समान पसरवा. त्यावर चिरलेल्या भाज्या आणि मक्याचे दाणे व्यवस्थित पसरवा.
तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात पनीरचे तुकडे देखील घालू शकता. आता वरून किसलेले मोझरेला चीज घाला.
तवा झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनिटे शिजू द्या, जेणेकरून चीज वितळेल आणि बेस पूर्णपणे शिजेल.
पर्यायाने तुम्ही हा पिझ्झा प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्येही बेक करू शकता.
शेवटी वरून ओरिगानो आणि चिली फ्लेक्स भुरभुरा. गरमागरम आणि पौष्टिक रागी पिझ्झा सर्व्ह करा.
हा हेल्दी रागी पिझ्झा चव आणि आरोग्य यांचा सुंदर समतोल साधतो.
Web Title: How to make ragi pizza at home recipe in marathi