नागपंचमीनिमित्त घर बनवा सुगंधी हळदीच्या पानांतील पातोळ्या
संपूर्ण देशभरात नागपंचमी मोठ्या आनंदात साजरा केली जाते. पहाटे लवकर उठून नाग देवतांची पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच यादिवशी घरात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर लागते. पुरणाचे दिंडे, गव्हाची खीर, खीर आणि पुरी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. यासोबतच नागपंचमीनिमित्त कोकणातील प्रत्येक गावी हळदीच्या पानांचा वापर करून पातोळ्या बनवल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हळदीची लागवड केली जाते. त्यानंतर हळूहळू हळदीचे पाने सगळीकडे दिसू लागतात. श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. त्यामुळे यादिवशी कोकणात हळदीच्या पानांचा वापर करून पातोळ्या बनवल्या जातात. पातोळ्या बनवताना हळदीच्या पानांचा येणारा सुगंध खवय्यांच्या पोटातील भूक वाढवतो. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हळदीच्या पानातील पातोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – @konkani_thali Instagram)
श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ