श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप
श्रावण महिन्यात महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी साबुदाणे, फळे किंवा वरीचा भात खाल्ला जातो. सर्वच घरांमध्ये प्रामुख्याने साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे अतिशय आवडीने खाल्ले जातात. मात्र नेहमीच साबुदाणा वडे किंवा ठराविक तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही रताळ्याचे चविष्ट कुरकुरीत काप बनवू शकता. रताळ खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. उपवासाच्या दिवशी पचनास अतिशय हलके असलेले पदार्थ खावेत. ज्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवत नाही. रताळ खाल्यामुळे शरीरात दीर्घकाळ ऊर्जा व्यवस्थित टिकून राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. रताळ्यांमध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही रताळ्याचे सेवन करू शकता. जाणून घ्या रताळ्याचे कुरकुरीत काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
नागपंचमीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पारंपरिक तिळाच्या करंज्या, नोट करून घ्या पदार्थ
सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा