Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

Sweet Dish : मऊ, गोड चवीचा कलाकंद कुणाला खायला आवडत नाही. अनेकदा आपण बाजारातून ही मिठाई विकत आणतो पण घरातच फ्रेश तयार केलेल्या कलाकंदची चव काही न्यारीच असते. मुख्य म्हणजे या रेसिपीसाठी फार निवडक साहित्यांची गरज लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 09:35 AM
Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल 'कलाकंद' घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल 'कलाकंद' घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • कलाकंद ही भारताची पारंपारिक मिठाई आहे.
  • गोड, मऊ चवीची ही मिठाई लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडते.
  • सोप्या पद्धतीने तुम्ही या रेसिपीला घरीच तयार करु शकता.
भारतीय मिठाईंमध्ये कलाकंद हा एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक गोड पदार्थ मानला जातो. दुधाचा समृद्ध स्वाद, हलकी दाणेदार टेक्स्चर आणि तोंडात विरघळणारी गोडी यामुळे कलाकंद अनेकांच्या आवडीचा असतो. सण-उत्सव, वाढदिवस किंवा खास पाहुणचारासाठी ही मिठाई उत्तम पर्याय ठरते. बाजारातील कलाकंद चविष्ट असला तरी घरच्या घरी बनवलेला ताजा कलाकंद अधिक शुद्ध आणि मनाला समाधान देणारा असतो.

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

ही रेसिपी बनवण्यासाठी फार अवघड साहित्य लागत नाही. दूध, पनीर आणि साखर यांच्या मदतीने अगदी कमी वेळात सुंदर कलाकंद तयार करता येतो. वरून पिस्ता किंवा बदाम घातल्यामुळे त्याची चव आणि आकर्षकपणा आणखी वाढतो. चला तर मग, घरच्या घरी मऊ आणि स्वादिष्ट कलाकंद कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 1 लिटर फुल फॅट दूध
  • 200 ग्रॅम पनीर
  • अर्धा कप साखर
  • 1/2 टीस्पून वेलची पूड
  • 1 टेबलस्पून तूप
  • सजावटीसाठी पिस्ता आणि बदाम काप
पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर सतत हलवत दूध अर्धे होईपर्यंत उकळा.
  • पनीर हाताने हलके चुरून घ्या. दूध घट्ट व्हायला लागल्यावर त्यात चुरलेले पनीर घाला.
  • हे मिश्रण सतत ढवळत राहा, जेणेकरून ते पातेल्याला चिकटणार नाही. मिश्रणाला हलकी दाणेदार टेक्स्चर येऊ द्या.
  • आता त्यात साखर घाला आणि पुन्हा नीट मिसळा. साखर वितळल्यावर मिश्रण थोडे सैल होईल, पण काही मिनिटांनी पुन्हा घट्ट होऊ लागेल.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. यामुळे कलाकंदाला सुंदर सुगंध येतो.
  • एका ताटाला किंवा ट्रेला तूप लावून तयार मिश्रण त्यात ओता. चमच्याच्या मदतीने समान पसरवा.
  • वरून पिस्ता आणि बदाम काप घालून हलके दाबा. पूर्ण थंड झाल्यावर 1 तास फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर चौकोनी तुकडे कापा.
  • घरचा ताजा आणि स्वादिष्ट कलाकंद सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
 

Web Title: How to make halvai style kalakand at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
1

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
2

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
3

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा
4

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.