१० मिनिटांमध्ये बनवा 'हाय प्रोटीन सॅलड'
सकाळच्या वेळी सगळ्यांचा ऑफिस आणि इतर ठिकाणी जाण्याची घाई असते. घाईच्या वेळी नाश्त्यामध्ये नेमकं काय बनवावं हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कारण सकाळी उठल्यानंतर घरातील लहान मुलांचा डब्बा, ऑफिसचा डब्बा, नाश्त्यातील पदार्थ इत्यादींमुळे खूप जास्त घाई होते. अश्या घाईच्या दिवशी नेमकं काय करावं असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर या पद्धतीने नाश्त्यासाठी हाय प्रोटीन सॅलड नक्की बनवून पहा. हे सॅलेड बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. तसेच कमीत कमी साहित्यामध्ये हाय प्रोटीन सॅलड बनवले जाते. सॅलेड बनवण्यासाठी मूग, मटकी इत्यादी इतर कडधान्यांचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये प्रथिने आणि विटामिन, कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘चुटकीभर’ हिंगाचे डोंगराएवढे फायदे