Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pongal: पोंगलसाठी घरीच बनवा सामई अरिसी, पारंपरिक स्वादासह घरच्यांना द्या चविष्ट मेजवानी

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मकरसंक्रांत साजरी होते दक्षिणेत याचदरम्यान पोंगल साजरे करण्यात येते आणि यासाठी सामई अरिसीचे पोंगल बनविण्यात येते. ही पारंपरिक दाक्षिणात्य रेसिपी कशी करायची जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 09, 2026 | 01:45 PM
सामई अरिसी रेसिपी

सामई अरिसी रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • सामई अरिसी म्हणजे काय
  • पोंगलसाठी खास चविष्ट पदार्थ 
  • सामई अरिसी रेसिपी मराठीत 
सामई अरिसी हा दक्षिणेतील तांदळाचा एक प्रकार आहे ज्याला लिटल मिलेट म्हणतात आणि हे तामिळ नाव आहे. हे एक पौष्टिक, ग्लूटेन-मुक्त प्राचीन धान्य असून ते दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये उच्च फायबर, प्रथिने आणि खनिजे असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे बहुगुणी धान्य उपमा, खीर, डोसा यांसारख्या पदार्थांमध्ये आणि भाताला पर्याय म्हणून वापरले जाते. कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि समृद्ध पोषक तत्वांमुळे ते पचनक्रिया सुधारणे, हाडे मजबूत करणे आणि वजन व्यवस्थापनासारखे फायदे देते.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मकरसंक्रांत साजरी होते त्याप्रमाणे दक्षिणेत पोंगल सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि यावेळी समई अरिसीचा अधिक वापर करण्यात येतो. पोंगल कसे बनवावे यासाठी महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लि. चे स्पेशालिटी शेफ गोपाळस्वामी एस. यांनी खास रेसिपी दिली आहे. तुम्हीही यावर्षी वेगळा काहीतरी पदार्थ करून पाहणार असाल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे. 

साहित्य काय घ्यावे

  • सामई अरिसी (लिटल मिलेट) – 300 ग्रॅम
  • स्प्लिट ग्रीन ग्राम (मूग डाळ) – 100 ग्रॅम
  • गूळ – 650 ग्रॅम
  • दूध – 100 मि.ली.
  • वेलची पूड (कुटलेली) – 2 ग्रॅम
  • तूप – 75 ग्रॅम
  • काजू – 25 ग्रॅम
  • मनुका – 25 ग्रॅम
  • पाणी – 600 मि.ली.
  • मीठ – चिमूटभर
सोपी कृती:
  • लिटल मिलेट आणि डाळ एकत्र धुवून 20 मिनिटे भिजत ठेवा, नंतर पाणी काढून वेगळ्या भांड्यात ठेवा
  • गुळाचा पाक तयार करून बाजूला ठेवा
  • डाळ प्रेशर कुकरमध्ये शिजवून बाजूला ठेवा
  • मातीच्या भांड्यात किंवा जाड तळाच्या भांड्यात पाणी, दूध, लिटल मिलेट आणि शिजवलेली डाळ घालून मंद आचेवर उकळू द्या
  • मिश्रण पूर्ण शिजल्यानंतर त्यात गुळाचा पाक घालून हलक्या हाताने सर्व बाजूंनी ढवळत काही मिनिटे मंद आचेवर शिजवा
  • तूप घालून हलक्या हाताने ढवळा, त्यानंतर वेलची पूड आणि थोडे नारळ घाला
  • तुपात तळलेले काजू, मनुका आणि नारळ पोंगलवर सजावटीसाठी घाला
टीप: तुपात तळलेले काजू, मनुका आणि नारळ घालून सजवा. मातीच्या भांड्यात किंवा केळीच्या पानावर पारंपरिक पद्धतीने सर्व्ह करा.

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

सरकारी पोंगल (गोड पोंगल)चे साहित्य

  • कच्चा तांदूळ – 250 ग्रॅम
  • मूग डाळ – 75 ग्रॅम
  • गूळ – 500 ग्रॅम
  • तूप – 100 ग्रॅम
  • वेलची – 2 ग्रॅम
  • पाणी – 900 मि.ली.
  • दूध – 100 मि.ली.
  • काजू – 50 ग्रॅम
  • मनुका – 50 ग्रॅम
  • मीठ – चिमूटभर
  • सुंठ (सुकं आले)
  • नारळाच्या पातळ चकत्या (सजावटीसाठी) – 50 ग्रॅम
सरकारी पोंगलची कृती:
  • तांदूळ आणि डाळ एकत्र धुवून 20 मिनिटे भिजत ठेवा, नंतर पाणी काढून बाजूला ठेवा
  • गूळ लहान तुकड्यांत करून बाजूला ठेवा
  • मातीच्या भांड्यात किंवा जाड तळाच्या भांड्यात पाणी, दूध, तांदूळ आणि डाळ घालून मंद आचेवर उकळू द्या
  • तांदूळ 95% शिजल्यावर गूळ घालून हलक्या हाताने सर्व बाजूंनी ढवळत काही मिनिटे मंद आचेवर शिजवा
  • तूप घालून हलक्या हाताने ढवळा, त्यानंतर वेलची पूड, सुंठ आणि थोडा नारळ घाला
  • तुपात तळलेले काजू, मनुका आणि तुपात तळलेला नारळ सजावटीसाठी घाला
‘या’ भाज्या वापरून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भोगीची भाजी, पदार्थ होईल चमचमीत

फणस पोंगल (जॅकफ्रूट पोंगल)चे साहित्य

  • कच्चा तांदूळ – 300 ग्रॅम
  • मूग डाळ – 75 ग्रॅम
  • गूळ – 400 ग्रॅम
  • फणस (चिरलेला) – 200 ग्रॅम
  • तूप – 120 ग्रॅम
  • वेलची – 2 ग्रॅम
  • पाणी – 700 मि.ली.
  • दूध – 100 मि.ली.
  • काजू – 50 ग्रॅम
  • मनुका – 50 ग्रॅम
  • मीठ – चिमूटभर
  • नारळाच्या पातळ चकत्या (सजावटीसाठी) – 50 ग्रॅम
फणसाच्या पोंगलची कृती:
  • तांदूळ आणि डाळ एकत्र धुवून 20 मिनिटे भिजत ठेवा, नंतर पाणी काढून बाजूला ठेवा
  • गूळ लहान तुकड्यांत करून बाजूला ठेवा
  • मातीच्या भांड्यात किंवा जाड तळाच्या भांड्यात पाणी, दूध, तांदूळ आणि डाळ घालून मंद आचेवर उकळू द्या
  • तांदूळ शिजल्यानंतर त्यात चिरलेला फणस आणि गूळ घालून हलक्या हाताने सर्व बाजूंनी ढवळत काही मिनिटे मंद आचेवर शिजवा (फणस जास्त वेळ शिजवू नका)
  • तूप घालून हलक्या हाताने ढवळा, त्यानंतर वेलची पूड आणि थोडा नारळ घाला
  • तुपात तळलेले काजू, मनुका आणि तुपात तळलेला नारळ सजावटीसाठी घाला
टीप: फणस जास्त वेळ शिजवू नका. फणस शेवटच्या टप्प्यातच घालावा. तुपात तळलेले काजू, मनुका आणि नारळ घालून सजवा. मातीच्या भांड्यात किंवा केळीच्या पानावर पारंपरिक पद्धतीने सर्व्ह करा.

Web Title: Samai arisi aka little millet pongal recipe by chef traditional gluten free ancient grain south indian cuisine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe
  • south Indian dish

संबंधित बातम्या

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी
1

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी

१० मिनिटांमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मिक्स व्हेज, हॉटेलच्या भाजीपेक्षा लागेल भारी चव
2

१० मिनिटांमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मिक्स व्हेज, हॉटेलच्या भाजीपेक्षा लागेल भारी चव

पारंपरिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! नाश्त्यासाठी बनवा सातूच्या पिठाची टिक्की, वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ
3

पारंपरिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! नाश्त्यासाठी बनवा सातूच्या पिठाची टिक्की, वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ

दिवसाची सुरुवात करा चमचमीत पदार्थाने! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मटार- पनीर सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
4

दिवसाची सुरुवात करा चमचमीत पदार्थाने! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मटार- पनीर सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.