Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेल सारखा लच्छा पराठा घरी कसा तयार करायचा? एक एक पदर होईल वेगळा… अवघ्या १५ मिनिटांची रेसिपी

अनेक हॉटेल्समध्ये सर्व्ह होणारा लच्छा पराठा हा मेन्यूतील स्टार पदार्थ आहे. भरगच्च पदरांनी भरलेला हा कुरकुरीत पराठा प्रत्येक भाजीसोबत लज्जतदार लागतो. चला याला घरी कसं तयार करायचं ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2025 | 01:00 PM
हॉटेल सारखा लच्छा पराठा घरी कसा तयार करायचा? एक एक पदर होईल वेगळा... अवघ्या १५ मिनिटांची रेसिपी

हॉटेल सारखा लच्छा पराठा घरी कसा तयार करायचा? एक एक पदर होईल वेगळा... अवघ्या १५ मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:

पराठा हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. पराठा अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो आणि यातीलच एक लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लच्छा पराठा. हा पराठा इतर पराठ्यांहून जरा वेगळा असतो. “लच्छा” म्हणजे थर, आणि या पराठ्याच्या प्रत्येक घासात तुम्हाला त्या थरांचा अनुभव येतो. याला बनवण्याची पद्धत जरा वेळखाऊ असली तरी याची चव मात्र या सर्व कष्टांना तोडीस तोड उत्तर देते.

चवीलाच काय तर बनवायलाही सोपी आहे मंचूरियन चिली; कुटुंबाला खुश करा आणि यंदा घरीच ट्राय करा ही रेसिपी

तुम्ही कोणत्याही भाजीसोबत हा लच्छा पराठा खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. हा पराठा मैद्यापासून तयार केला जातो आणि बहुतेक हॉटेल्समध्ये तो सर्व्ह होतो. हा भारतीय पदार्थ तुम्ही भाजीसोबत खाल तर त्याची चव तुमच्या तोंडात अक्षरशः रेंगाळत राहील. अनेकांना वाटते की लच्छा पराठा घरी तयार करणं फार कठीण आहे मात्र असं काहीच नाही. तुम्ही फार सहज आणि झटपट हा लच्छा पराठा घरी तयार करू शकता. चला लगेच नॉट करूयात याची रेसिपी.

साहित्य

  • मैदा (गव्हाच्या पिठानेही चालतो) – २ कप
  • मीठ – ½ टीस्पून
  • साखर – ½ टीस्पून
  • तेल / तूप – २ टेबलस्पून (मळण्यासाठी)
  • पाणी – लागेल तेवढं (पीठ मळण्यासाठी)
  • साजूक तूप – थर लावण्यासाठी आणि भाजताना
  • कोरडं पीठ – लाटण्यासाठी
सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा, दिवसाची सुरुवात होईल मस्त

कृती

  • एका परातीत मैदा, मीठ, साखर आणि २ टेबलस्पून तेल घालून मिसळा. नंतर थोडं थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळा. झाकून १५-२० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
  • पीठ थोडं मळून छोटे गोळे तयार करा.
  • प्रत्येक गोळा लाटून पातळ पोळी करा. त्यावर थोडंसं तूप लावा आणि वरून थोडं कोरडं पीठ शिंपा.
  • आता पोळीला पंख्यासारख्या पट्ट्यांमध्ये (स्ट्रिप्स) फोल्ड करत करत रोल करा
  • मग त्या रोलला घड्याळाच्या काट्यासारखं गुंडाळा आणि पुन्हा थोडी जाडसर पोळी लाटा.
  • तवा गरम करा. त्यावर लाटलेला लच्छा पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तूप लावून कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजा.
  • भाजून झाल्यावर गरम असताना पराठ्याला दोन्ही हातांनी थोडं दाबा म्हणजे त्याचे थर वेगळे दिसू लागतील.
  • तुम्ही तूपाच्या ऐवजी बटर वापरू शकता.
  • अजून कुरकुरीत हवं असेल तर भाजताना थोडं जास्त तूप लावायला हरकत नाही.
  • गरमागरम लच्छा पराठा दही, लोणचं किंवा पनीर ग्रेव्हीबरोबर सर्व्ह करा आणि याच्या चविचा आस्वाद घ्या
 

Web Title: How to make hotel style lachha paratha at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.