Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेल्दी पण टेस्टी रेसिपी! सकाळचा नाश्ता होईल आणखीन मजेदार, थंडीत घरी बनवा गुजराती स्टाईल ‘मेथी थेपला’

Methi Thepla Recipe : सकाळचा नाश्ता काय करावा हा गृहिणींचा नेहमीचा प्रश्न... पण आता या प्रश्नाला पूर्णविराम द्या आणि घरी बनवा गरमा गरम टेस्टी पण तितकाच हेल्दी असा मेथीचा थेपला. हा गुजरातचा एक फेमस नाश्त्याचा प्रकार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 25, 2026 | 03:23 PM
हेल्दी पण टेस्टी रेसिपी! सकाळचा नाश्ता होईल आणखीन मजेदार, थंडीत घरी बनवा गुजराती स्टाईल 'मेथी थेपला'

हेल्दी पण टेस्टी रेसिपी! सकाळचा नाश्ता होईल आणखीन मजेदार, थंडीत घरी बनवा गुजराती स्टाईल 'मेथी थेपला'

Follow Us
Close
Follow Us:
  • गुजराती खाद्यपदार्थांमध्ये मेथीचा थेपला आवर्जून समाविष्ट होतो.
  • हा एक असा नाश्ता आहे चवीलाही चांगला लागतो आणि आरोगयासाठीही पौष्टिक ठरतो.
  • मेथीचा थेपला बनवण्यासाठी निवडक साहित्यांची गरज लागते.
गुजराती स्वयंपाकघरातील एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे मेथी थेपला. मेथीच्या पानांचा ताजेपणा, मसाल्यांचा सुगंध आणि गव्हाच्या पिठाची मऊसर चव यांचा सुंदर संगम म्हणजे थेपला. हा पदार्थ केवळ चवीला अप्रतिम नसून आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या पदार्थाची निवड करू शकता.

२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत ‘गाजर पाक’, झटपट तयार होते रेसिपी

मेथीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळेच मेथी थेपला हा नाश्ता, डबा, प्रवासासाठी किंवा उपवासानंतर हलका आहार म्हणून खूप आवडला जातो. दही, लोणचं किंवा चटणीसोबत गरमागरम थेपला खाल्ला की जेवणाचा आनंद द्विगुणित होतो. तुम्ही गरमा गरम चहासोबतही याची करा लुटू शकता. आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने, पारंपरिक चवीचा मेथी थेपला कसा बनवायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

 साहित्य 

  • गव्हाचे पीठ – २ कप
  • बारीक चिरलेली ताजी मेथी – १ कप
  • दही – ½ कप
  • हळद – ½ टीस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • धणे-जिरे पूड – १ टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – १ टीस्पून (ऑप्शनल)
  • तेल – २ टेबलस्पून
  • मळण्यासाठी पाणी – आवश्यकतेनुसार
Food Recipe: १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कोथिंबीर-पनीर कबाब, नोट करून घ्या रेसिपी

 कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, चिरलेली मेथी, मीठ, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, हिंग एकत्र करा.
  • आता त्यात दही आणि तेल घालून सर्व साहित्य नीट मिसळा.
  • थोडेथोडे पाणी घालून मऊ पण घट्ट पीठ मळून घ्या.
  • यानंतर  तयार पीठ झाकून १०–१५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  • नंतर पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून पोळीप्रमाणे लाटून घ्या.
  • गरम तव्यावर तयार थेपला टाका आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • सर्व थेपले अशाच प्रकारे तयार करून एका प्लेटमध्ये काढा.
  • आता गरमागरम मेथी थेपला दही, लोणचं किंवा हिरवी चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • हा पदार्थ २–३ दिवस टिकतो, त्यामुळे प्रवासासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे.
 

Web Title: Healthy yet tasty know how to make gujrati style methi thepla recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Healthy Breakfast
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी
1

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
2

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी
3

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
4

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.