सोप्या पद्धतीमध्ये बनवा ज्वारीचे पिठाचे चविष्ट थालीपीठ
रोजच्या आहारात नेहमीच सात्विक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. दुपारच्या जेवणात भात, डाळ, चपाती, भाजी इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. डाळ भात पचनासाठी अतिशय हलका पदार्थ आहे.तसेच दुपारच्या जेवणात नेहमीच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात वेगवेगळ्या कडधान्यांपासून बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.ज्वारी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. ज्वारीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेले थालीपीठ खाऊ शकता. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात कोणत्याही गोड किंवा तांदळाच्या पदार्थांचे सेवन न करता ज्वारी किंवा नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. चला तर जाणून घेऊया ज्वारीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
चॉकलेट प्रेमींसाठी खास! घरीच सोप्या पद्धतीने बनवा थंडगार आणि गोडसर Chocolate Ice Cream
दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी! पुरीसोबत लागेल सुंदर चव