
सोप्या पद्धतीमध्ये बनवा खुसखुशीत करंजी
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.दिवाळी सणाच्या काही दिवसांआधी सगळीकडे मोठी लगबग असते. घराची साफसफाई, दिवाळीची खरेदी, फराळ इत्यादी अनेक गोष्टी दिवाळी सणाला केल्या जातात. लाडू,करंज्या, चकली इत्यादी फराळाचे पदार्थ बनवल्याशिवाय दिवाळी सण साजरा झाल्यासारखा वाटत नाही. अनेक घरांमध्ये दिवाळीच्या पाच ते सहा दिवस आधी लाडू, करंज्या बनवण्यास सुरुवात केली जाते. फराळातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे करंज्या. करंज्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे अनेक घरांमध्ये करंज्या विकत आणल्या जातात. पण विकतच्या करंज्या खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीसुद्धा करंज्या बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खुसखुशीत खोबऱ्याच्या करंज्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या करंज्या बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)