सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कारल्याचं झणझणीत भरीत
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कारलं खायला आवडत नाही. चवीला कडू असणाऱ्या कारल्याचे नाव घेतल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. पण कारल्याची भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक लोक उपाशी पोटी कारल्याच्या रसाचे सेवन करतात. कारल्याच्या रसात चिमूटभर काळे मीठ टाकून प्यायल्यास बद्धकोष्ठता आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळेल. कारल्याची भाजी चवीला कडू लागते. पण या भाजीचे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन केल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झणझणीत कारल्याचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कारल्याचे भरीत भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. अनेक घरांमध्ये चिंच, गूळ घालून भाजी बनवली जाते तर काही लोक ओल खोबर घालून कारल्याची भाजी बनवतात. चला तर जाणून घेऊया कारल्याचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
कोळंबीचे थालीपीठ कधी खाल्ले आहेत का? नॉनव्हेज लव्हर्स झटपट फॉलो करा रेसिपी