गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट केशर शिरा
शिरा ही आपली नेहमीची गोड आणि सोपी डिश आहे. घरी कोणी पाहुणे आले, उपवासात गोड पदार्थाची इच्छा झाली किंवा कधी झटपट काहीतरी गोड बनवायचं असेल तर आपण पटकन शिरा बनवतो. सकाळच्या नाश्त्यात किंवा घरात सणावाराच्या दिवसांमध्ये गोड शिरा बनवला जातो. पण कायमच शिरा बनवताना रव्याच्या गुठळ्या होतात. रव्यामध्ये गुठळ्या झाल्यानंतर पदार्थांची चव अतिशय खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला माव्यासारखा मोकळा आणि चवदार केशर शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. घरात सणाच्या दिवशी आवर्जून शिरा बनवला जातो. गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. काहींना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते तर काहींना सकाळच्या नाश्त्यात गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. सकाळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. कारण उपाशी पोटी जास्त वेळ राहिल्यास शरीरात पित्त वाढते आणि आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया केशर शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)