पितृपक्षात नैवेद्यासाठी झटपट बनवा आंबट गोड आमसुलाची चटणी
गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर सगळीकडे पितृपक्षाला सुरुवात होते. या दिवसांमध्ये पितरांची पूजा करून वेगवेगख्या प्रकारचा नैवेद्य बनवून अर्पण केला जातो. नैवेद्याच्या ताटात वरण, भात, पुऱ्या, भाज्या, भजी, पापड, कुरडई, खीर, पुरी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. या सर्व पदार्थांमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमसुलाची चटणी. जेवणातील पदार्थ बनवताना कोकमचा वापर केला जातो. आंबट चवीचे कोकम सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. कोकम कढी, सोलकढी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. कोकम खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये विटामिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर्स आणि पाचक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कोकम खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.पूर्वीच्या काळी कोकम पितृपक्षसोबत जोडले गेले होते. त्यामुळे जेवणातील पदार्थ बनवताना कोकमाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये आमसुलाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
रात्रीच्या जेवणात चमचमीत पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्चा केळीची मसालेदार काप