रात्रीच्या जेवणात चमचमीत पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्चा केळीची मसालेदार काप
प्रत्येक घरात कायमच बटाटा, वांगी, सुरण इत्यादी भाज्यांपासून कुरकुरीत काप बनवली जातात. जेवणात कायमच डाळ भात भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ सगळ्यांचं हवा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी कच्चा केळीची काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सर्वच ऋतूंमध्ये बाजारात कच्ची केळी उपलब्ध असतात. कच्च्या केळीची वेफर्स किंवा भाजी तुम्ही खाल्लीच असेल. कच्च्या केळीची काप गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतात. याशिवाय लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा मसालेदार केळीची काप बनवू शकता. घरातील प्रत्येक व्यक्ती केळीची काप आवडीने खातील. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात केळीची मसालेदार कुरकुरीत काप तयार होतात. चला तर जाणून घेऊया केळीची काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ