दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा आंबट-तिखट लेमन राईस
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जेवणात भात खाल्ला जातो. भात आणि डाळ खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही. जेवणात भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. फोडणीचा भात, मसालेभात, खिचडी किंवा भाताचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. मात्र जेवणात नेहमीच साधा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी लेमन राईस बनवू शकता. लिंबू आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला भात दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. कोशिंबीर किंवा रायत्यासोबत लेमन राईस खाल्ला जातो. दुपारच्या जेवणात किंवा घरी पाहुणे आल्यानंतर काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही साध्या भाताला सुंदर फोडणी देऊन लेमन राईस बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लेमन राईस बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
नाश्त्यात हवा आहे हेल्दी पदार्थ! सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिमी पालक स्मूदी, नोट करा रेसिपी