Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या कढीला द्या मसालेदार तडका! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट मसाला कढी, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

कायमच जेवणात डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरात मसाला कढी बनवू शकता. हा पदार्थ वाफाळत्या भातासोबत किंवा गरामागरम भाकरीसोबत अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 04, 2025 | 10:37 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट मसाला कढी

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट मसाला कढी

Follow Us
Close
Follow Us:

आठवड्यातून एकदा प्रत्येक घरात कढी बनवली जाते. कधी टोमॅटोची कढी बनवली जाते तर कधी कोकम कढी बनवली जाते. घाईगडबडीच्या वेळी झटपट काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी अनेक लोक बाहेरून विकत आणलेले पदार्थ खातात. पण कायमच विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कढी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला मसाला कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भातासोबत किंवा इतर सर्वच पदार्थांसोबत अतिशय सुंदर लागतो. दह्याची कढी बनवल्यानंतर त्यात बेसन आणि इतर पदार्थ टाकले जातात. ज्यामुळे कढी चव अतिशय सामान्य लागते. पण कढी आणखीनच झणझणीत होण्यासाठी तुम्ही कढीला मसाल्यांचा तडका देऊ शकता. यामुळे कढीची चव आणखीनच वाढेल आणि जेवणात चार घास जास्त जातील. गरमागरम भातासोबत मसाला कढी अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया मसाला कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

पावसाळ्यात मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Spring Roll, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • दही
  • बेसन
  • मोहरी
  • जिरं
  • लसूण
  • मीठ
  • कढीपत्ता
  • मेथी दाणे
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • तिखट मिरची
  • हिंग
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी

कृती:

  • मसाला कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर अर्धा किंवा एक चमचा बेसन टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करताना बेसनमध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नये. यामुळे कढी व्यवस्थित होत नाही.
  • टोपात तेल गरम करून घ्या मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची पाने, मेथी दाणे टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात किसलेलं आलं, लसूण घालून फोडणी भाजा.
  • त्यानंतर त्यात थोडासा कांदा टाकून लाल होईपर्यंत भाजून घ्या. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात तयार केलेले बेसनाचे मिश्रण ओतून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. कढीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • फोडणी तयार करताना फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, कढीपत्ता आणि लाल घालून फोडणी मिक्स करा आणि तयार केलेल्या कढीमध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसाला कढी. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make masala kadhi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव
1

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव

उन्हाळी डेझर्ट! थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम
2

उन्हाळी डेझर्ट! थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम

साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव
3

साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव

मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
4

मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.