नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये वाटीभर मटारपासून बनवा चविष्ट धिरडे
हिवाळ्यात बाजारात हिरव्या पालेभाज्या, मटार इत्यादी अनेक फळे भाज्या उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पालेभाज्या,फळे, ड्रायफ्रुटसचे सेवन करावे. इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरवे मटार ताजे आणि फ्रेश असतात. वर्षभरात अतिशय महाग किमतीला विकले जाणारे मटार हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्वस्त असतात. मटारपासून तुम्ही मटार करंजी, मटार उसळ, मटार पुलाव, मटार बटाटा रस्सा भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. पण आज आम्ही तुम्हाला मटार धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटार धिरडे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये मटार धिरडे तयार होतात. तसेच मटार खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. मटार खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया हेल्दी टेस्टी मटार धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा