
साधा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरवे मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मटार खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. हिरवे मटार चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहेत. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे नेहमीच सेवन करावे. यामुळे शरीराला पोषण मिळते आणि तुम्ही कायमच हेल्दी राहता. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ ढोकळा. बेसन पिठापासून बनवलेला ढोकळा खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मटार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटार ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे. कमीत कमी साहित्यात बनवलेला सोपा पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया मटार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Pongal: पोंगलसाठी घरीच बनवा सामई अरिसी, पारंपरिक स्वादासह घरच्यांना द्या चविष्ट मेजवानी