वाटीभर मटार आणि पोह्यांपासून बनवा चविष्ट कुरकुरीत टिक्की
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी एकत्र बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात तर पॅक बंद पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेल्या तेलकट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे लहान मुलांच्या आरोग्यासह मोठ्यांचे सुद्धा आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकाळच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये वाटीभर मटार आणि पोह्यांचा वापर करून चविष्ट टिक्की बनवू शकता. हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला जीवनसत्वे, कॅल्शियम, प्रोटीन इत्यादी अनेक घटक मिळतात. चला तर जाणून घेऊया मटार पोह्यांची टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा, लहान मुलांचे आरोग्य राहील निरोगी
गोड खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा संत्र्याची खीर, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक