उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरीच बनवा थंडगार मटका कुल्फी
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड पदार्थ खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि थंड वाटू लागते. या दिवसांमध्ये थंड पदार्थ, आईस्क्रीम, कुल्फी, ताक, लस्सी इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी बाजारात मिळणारे थंडगार आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी मटका कुल्फी बनवू शकता. मटका कुल्फी चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी वेळात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी कुल्फी बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कुल्फी हा पदार्थ खायला खूप आवडतो. कुल्फीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मटका कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
मासे खाण्याची इच्छा झाल्यास दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात
हानिकारक केमिकल्सचा वापर न करता घरीच बनवा डाळिंबाची जेली, नोट करून घ्या सोपी रेसिपी