हानिकारक केमिकल्सचा वापर न करता घरीच बनवा डाळिंबाची जेली
लहान मुलांना भूक लागल्यानंतर किंवा डब्यात चपातीसोबत जॅम दिले जाते. चवीला गोड असलेले जॅम किंवा फ्रुट पल्प लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. बाजारात वेगवेगळ्या फळांचे जॅम, जेली आणि फ्रुट पल्प उपलब्ध आहेत. मात्र हे पदार्थ बनवण्यासाठी काही प्रमाणात केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. पण केमिकल युक्त पदार्थांचे दैनंदिन आहारात सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डाळिंबाच्या दाण्यांचा वापर करून होममेड जेली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. डाळिंब खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतात. याशिवाय डाळिंबामध्ये असलेले इतर घटक शरीरासाठी महत्वाचे आहे. लहान मुलांसाठी बाजारातून विकत आणलेली जेली खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली जेली नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये डाळिंब जेली बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Tomato Sandwich, नोट करून घ्या सिंपल रेसिपी
मासे खाण्याची इच्छा झाल्यास दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात