
दिवसाची सुरुवात होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा टपरीवर मिळतो तसा चविष्ट उकाळा
टपरीवरचा चहा प्यायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. टपरीवर चहासोबतच, कॉफी आणि उकाळासुद्धा मिळतो. उकाळा पिणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. स्वयंपाक घरातील काही ठराविक पदार्थांचा वापर करून उकाळा बनवला जातो. सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते तर काहींच्या दिवसाची सुरुवात उकाळा पिऊन होते. जिभेची खराब झालेली सुधारण्यासाठी उकाळा पिण्याचा सल्ला दिला जातो. उकाळा हा पारंपरिक पदार्थ आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून बनवलेला उकाळा चवीला अतिशय सुंदर लागतो. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उकाळा प्यावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उकाळा बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या कामात, घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘इंन्सटंट उपमा’