
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ओट्स खीर
सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात काहींना काही गोड पदार्थ कायमच बनवला जातो. शिरा, शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम, रस्सागुला इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण हे पदार्थ बनवताना साखरेचा वापर केला जातो. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर आजारांनी त्रस्त असलेले लोक गोड पदार्थ खाणे टाळतात. याशिवाय अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी आणि टेस्टी ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओट्स खाल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे क्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागलं नाही. ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि दिवसभर शरीर सक्रिय राहते. तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ओट्स अतिशय फायदेशीर आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – pinterest)
वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा, नोट करून घ्या रेसिपी