साध्या जेवणाची वाढेल रंगतदार चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेलस्टाईल चमचमीत पनीर भुर्जी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर पासून बनवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पनीरचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पनीर मसाला, पनीर कबाब, मटार पनीर, पनीर कढाई इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हॉटेल स्टाईल पनीर बुर्जी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा ढाब्यावर जेवायला गेल्यानंतर शहाकरी लोकांसाठी पनीर बुर्जी मागवली जाते. पनीर बुर्जी हा पदार्थ उत्तर भारतातील फेमस पदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय पोट सुद्धा भरलेले राहते आणि दुपारी लवकर भूक लागत नाही. कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तो कायमच विकत आणला जातो. पण नेहमीच बाहेरील पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पदार्थाचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया हॉटेल स्टाईल पनीर बुर्जी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






