वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा
झणझणीत चवीचा ठेचा सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात कायमच ठेचा वाढला जातो. भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर किंवा कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन बोर झाल्यानंतर झणझणीत ठेचा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ला जातो. यापूर्वी तुम्ही कायमच लसूण ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचा ठेचा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला कारल्याच्या भाजीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चवीला कडू असलेले कारलं खायला अनेकांना आवडत नाही. पण या भाजीमध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कडू कारल्याचा रस किंवा भाजीचे सेवन केले जाते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले कारलं चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कारल्याचा ठेचा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप






