
आंबट संत्री खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीने झटपट बनवा रसाळ संत्र्यांची गोड जेली
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनेक वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. त्यातील अनेकांच्या आवडीचे फळ म्हणजे संत्री. आंबटगोड चवीची संत्री शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. विटामिन सी युक्त फळांचे किंवा पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. आपल्यातील अनेकांना आंबट फळे खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही ताज्या संत्र्याचा वापर करून चविष्ट जेली बनवू शकता. लहान मुलं जेली हा पदार्थ आवडीने खातात. बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या जेलीमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. हे रंग शरीरासाठी हानीकारक ठरतात. त्यामुळे घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये जेली बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर