
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर कॉर्न सँडविच
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात घरातील प्रत्येकालच काहींना काही चमचमीत आणि झटपट तयार होणारा पदार्थ खायचा असतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर कॉर्न सँडविच बनवू शकता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मक्याच्या दाण्यांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याशिवाय बऱ्याचदा नाश्त्यात तिखट किंवा तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे अपचनाची समस्या उद्भवते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नेहमीच पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. अतितिखट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. चला तर जाणून घेऊया पनीर कॉर्न सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)