Paneer Crispy Recipe : कुरकुरीत, मसालेदार चवीची पनीर क्रिस्पी चायनीज पदार्थांमधील एक लोकप्रिय डिश आहे. खास प्रसंगी बाहेरून न मागवता तुम्ही हा पदार्थ घरीच तयार करू शकता.
(फोटो सौजन्य: Gemini)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
चायनीज लव्हर्ससाठी पनीर क्रिस्पी म्हणजे आवडीची डिश.
फार ग्रेव्ही नसलेली ही डिश स्टार्टर्सला खाल्ली जाते.
आज आपण घरच्या घरी पनीर क्रिस्पी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत.
पनीर क्रिस्पी हा एक लोकप्रिय इंडो-चायनीज स्टार्टर आहे जो अनेक रेस्टॉरंटमध्ये खूप आवडीने खाल्ला जातो. कुरकुरीत तळलेले पनीर आणि त्यावर टाकलेला हलका चटपटीत सॉस यामुळे या पदार्थाची चव आणखी वाढते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असलेले पनीर, सोबत लसूण, मिरची आणि सॉसचा मसालेदार स्वाद मिळून हा पदार्थ खूपच स्वादिष्ट लागतो. संध्याकाळचा नाश्ता, पार्टी स्नॅक किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी खास बनवायचे असेल तर रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी उत्तम पर्याय ठरतो. ही रेसिपी घरी बनवणे खूप सोपे आहे आणि कमी वेळात तयार होते. चला तर मग चटपटीत आणि सॉसी पनीर क्रिस्पी कसे बनवायचे ते याची रेसिपीजाणून घेऊया.