Breakfast Recipe: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटात बनवा Potato bread toast
सकाळी उठल्यानंतर सर्वच स्त्रियांची खूप जास्त घाईगडबड असते. सकाळचा नाश्ता, दुपारचा जेवणाचा डबा, लहान मुलांचा डबा आणि कामाच्या इतर धावपळींमध्ये वेळ कसा निघून जातो समजतच नाही. अशावेळी सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावे? हा प्रश्न प्रत्येकाला स्त्रीला पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा तेच पराठे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बटाटा ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल. याशिवाय लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम आहे.सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. भूक लागल्यानंतर कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे शरीराला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया बटाटा ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






