गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच घाई असते. घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. जेवणाच्या डब्यात कायमच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाटा वाटण्याची चमचमीत भाजी बनवू शकता. वाटण्याची भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती, भात किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. जेवणातील अनेक पदार्थ बनवताना ओल्या खोबऱ्याच्या वाटपाचा वापर केला जातो. पण कायमच मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे डब्यासाठी तुम्ही कांदा टोमॅटोचा वापर करून बनवलेली बटाटा वाटण्याची भाजी सहज बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)