सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच
रविवार म्हणजे सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी घरातील प्रत्येकालच काहींना काही चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. अनेक लोक सुट्टीच्या दिवशी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खातात. मात्र नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढणे, बद्धकोष्ठता याशिवाय इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नाश्त्यात किंवा जेवणात नेहमीच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बटाटा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटाटा खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. बटाट्याचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. याशिवाय लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप जास्त आवडतात.सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया बटाटा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चहा मलाई टोस्ट, सोशल मीडियावरील व्हायरल रेसिपी