
संध्याकाळच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पंजाबी स्टाईल दाल तडका
जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात डाळभात, भाजी, चपाती हे ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण नेहमीच फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये पंजाबी स्टाईल दाल तडक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दाल तडका तुम्ही गरमागरम वाफाळत्या भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. जेवणाची चव वाढवण्यासाठी पदार्थाला कायमच फोडणी दिली जाते. फोडणीवर संपूर्ण पदार्थाची चव अवलंबुन असते. त्यामुळे डाळीला किंवा इतर कोणत्याही पदार्थांना फोडणी देताना त्यात सर्व पदार्थ अंदाजाने टाकावेत. यामुळे पदार्थाची चव सुधारते. पंजाबी स्टाईल पदार्थ खाण्यासाठी कायमच हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जावे लागते. पण घरच्या घरी सुद्धा तुम्ही पंजाबी स्टाईल दाल तडका बनवू शकता. कमीत कमी साहित्यात बनवले जाणारे पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊया दाल तडका बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
One Pot Recipe: १० मिनिटांत कुकरमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी, सकाळचा नाश्ता होईल आणखीनच मजेदार